सोमवारी 8 रोजी बेळगाव मनपा समोरील अनाधिकृत ध्वज हटवा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या भव्य महा मोर्चाच्या पाश्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी समिती नेत्यांना नोटीशी बजावल्या आहेत.
मोर्चा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास व सार्वजनिक मालमत्तेच नुकसान झाल्यास आयोजक जबाबदार असतील असे नोटिशीत म्हटले आहे.
स्थानिक पोलिसांची कोणतीही परवानगी असल्याशिवाय मोर्चा काढू शकत नाही.राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग अडवू शकत नाही रॅली वरून काढू शकत नाही.रहदारीला अडचण होईल असे करू नये.
रॅली दरम्यान कोणतीही वादग्रस्त तेढ निर्माण करणारी भाषण आणि घोषणा देऊ नयेत.मोर्चा दरम्यान कोणतीही दुकाने बळजबरीने बंद करायला जबरदस्ती करू नये.
काळी फित काळी निशाण परिधान करू नये रॅलीत सायकली मिरवणूक,बॅनर नको अश्या सूचना नोटीस मध्ये बजावण्यात आल्या आहेत.
युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके,मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या सह समिती नेत्यांना या नोटीशी बजावण्यात आल्या आहेत.मार्केट पोलीस उपायुक्त सदाशिव कट्टीमनी यांनी नोटीस बजावली आहे.