प्रत्येक व्यक्ती आयुष्यात निदान आपल्या अंत्यविधीच्या खर्चाची तरतूद जरूर करून ठेवते.
परंतु एवढीही तरतूद करू न शकणाऱ्यांसाठी महापालिकेने मोफत अंत्यविधी योजना सुरू केली पाहिजे पण बेळगाव परिसरात अशी व्यवस्था अजून तरी सुरू झालेली नाही.
आज बेळगाव शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कॅम्प येथील मुकेश कृष्णा वेंबुलकर या चाळीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, महिन्यापूर्वीच आईचे निधन, दोन वर्षांपूर्वी आणखिन एका भावाचे निधन,वडिलांचे निधन अशातच घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्यावर अंत्यसंस्कार कसे करावे याचा विचार त्याचा भाऊ आणि बहीण करीत बसले असताना देशपांडे नामक व्यक्तीने जायंट्स मेन या सेवाभावी संस्थेबद्दल त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली.
त्याच्या भावाने संपर्क साधताच जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली.तात्काळ अध्यक्ष संजय पाटील, विभागीय संचालक मदन बामणे, अजित कोकणे, अविनाश पाटील आणि सुनिल मुरकुटे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि शववाहिकेची व्यवस्था करून मृतदेह सदाशिवनगर स्मशानभूमीत आणला.
स्वतः पैसे खर्च करून लाकडे आणण्यापासून ते सरणावर मृतदेह ठेऊन लाकडे रचण्यापर्यंतचे सर्व काम जायंट्स मेनच्या सदस्यांनी केले,तो तरुण अविवाहित असल्याने त्याचे विधिवत लग्न सुद्धा लावले आणि भविष्यात महानगरपालिकेने किमान गरिबांना तरी मोफत अंत्यसंस्काराची व्यवस्था करावी अशी मागणी केली.