रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणातील सत्य पोलीस समोर आणतील, असे वक्तव्य सतीश जारकीहोळी यांनी केले. मच्छे येथील वाल्मिकी समुदायाच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. हेलिकॉप्टरमधून दाखल झालेल्या सतीश जारकीहोळींनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सीडी प्रकरणी वक्तव्य केले.
रमेश जारकीहोळींनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात तपासाअंती सत्य काय ते बाहेर पडेलच, थोडी प्रतीक्षा करा. यामागे असलेल्या राजकीय षडयंत्राबद्दल मला काहीही माहिती नाही.
ब्लॅकमेल करण्यासाठी हे कारस्थान रचण्यात आल्याचे रमेश जारकीहोळींनी म्हटले आहे. त्यामुळे यातील तथ्य काय आहे, याचा तपास पोलीस घेतील असेही सतीश जारकीहोळी म्हणाले.
सीडीप्रकरणी संबंधित तरुणीने व्हिडिओबद्दल प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व प्रकरणी आता पोलिसांनीच तोडगा काढावा. तरुणीने केलेल्या विधानानंतर तरुणीवर अन्याय झाल्याचेही चित्र समोर आले आहे.
संबंधित तरुणीने व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून आपला निरोप देण्याऐवजी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येऊन खुलासा केला असता, तर योग्य झाले असते असेही जारकीहोळी म्हणाले. परंतु यामागे नेमके काय आहे, या प्रकारांची पार्श्वभूमी काय आहे हे पोलीस तपासाअंतीच निष्पन्न होईल.
मी कोणतीही प्रतिक्रिया द्यावी तर या प्रकरणी मला पूर्ण माहिती नाही. त्यामुळे यावर पूर्णपणे मला काही सांगता येणार नाही. पोलिसांचीच भूमिका महत्वपूर्ण असेल, असे मत सतीश जारकीहोळींनी व्यक्त केले.