Monday, December 30, 2024

/

येत्या रविवारी पुन्हा शहराचा वीज पुरवठा खंडित

 belgaum

तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे येत्या रविवार दि. 21 मार्च 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बेळगाव शहरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार असल्याचे हेस्काॅमने कळविले आहे.

बेळगाव शहरातील रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित असणारे भाग पुढील प्रमाणे आहेत. एफ -1 कॅन्टोन्मेंट, एफ -2 नानावाडी, एफ -3 हिंदवाडी, एफ -4 मारुती गल्ली, एफ -5 शहर, एफ -6 टिळकवाडी, एफ -8 शहापूर, एफ -10 पाटील गल्ली. 33 केव्ही सदाशिव वीजपुरवठा केंद्राअंतर्गत येणारे सर्व भाग. 33 केव्ही केएलई एचडी, 33 केव्ही यूके -27, एफ -1 इंडाल, कंग्राळी बी. के. इंडस्ट्रियल एरिया, एफ -2 ऑटोनगर, एफ -4 वैभवनगर, एफ -5, एफ -6 शिवाजीनगर, एफ -7, एफ -8 आयसीएमआर, एफ -9 सदाशिवनगर, एफ -10 जीनबकुळ, एफ -11 सिव्हिल हॉस्पिटल, एफ -12 हेस्कॉम. तरी नागरिकांनी सदर खंडित वीज पुरवठ्याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.