राज्यात सीलडाऊन, नाईट कर्फ्यू किंवा लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकसह देशातील अनेक राज्यांमधील कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. कोविड परिस्थितीतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेतली. या बैठकीत कोरोना परिस्थितीवर खबरदारी आणि उपाय योजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
या सभेनंतर मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी माहिती दिली. कर्नाटकात मात्र सिलडाऊन, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. बंगळूरमध्ये 3 कोविड सेंटर स्थापन करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राने जारी केलेल्या मार्गसुचिचा अवलंब करून सामाजिक अंतर आणि सुरक्षित उपाययोजना अवलंबून इनडोअर कार्यक्रम, सिनेमागृह याठिकाणी कोरोना संसर्गापासून बचावासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
तसेच बंगळूर, बिदर आणि कलबुर्गी या तीन जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी अधिक लक्ष पुरविण्यात येणार आहे, याव्यतिरिक्त ज्या ज्या भागात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे, अशाठिकाणी अतिरिक्त निगराणी ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले.