जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना शहरातील नियती फाउंडेशनतर्फे दिला जाणारा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार -2021” यंदा 10 कर्तुत्ववान महिलांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 7 मार्च 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
क्लब रोडवरील हॉटेल इफाच्या सभागृहांमध्ये नियती फाउंडेशनच्या संस्थापक -अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका रोहिणी गोगटे आणि सन्माननीय अतिथी म्हणून नविना शेट्टीगार या उपस्थित राहणार आहेत. नियती फाउंडेशनतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार -2021 साठी पुढील दहा कर्तृत्ववान महिलांची निवड करण्यात आली आहे.
महिला आणि युवा सक्षमीकरणाच्या अतुल्य कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार : वैजयंती चौगुला, पोलीस दलातील असामान्य सेवा : यशोदा वंटगोडी, संगीत क्षेत्रातील योगदान : अर्चना बेळगुंदी,
समाज सेवेचे कार्य : प्रतिभा आपटे, भरतनाट्यम क्षेत्रातील योगदान : रेखा हेगडे, शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील योगदान : कीर्ती शिवकुमार, वन आणि प्राणी संवर्धन : रोहिणी पाटील, शिक्षण क्षेत्रातील योगदान : स्वाती जोग, सामाजिक कार्य : सुरेखा पाटील आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान : मैत्रयी संगम बैलुर.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या सर्व दहा कर्तृत्ववान महिलांना रविवारी होणाऱ्या सोहळ्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.