कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या इतर राज्यांमध्ये वाढत चालली आहे. सरकारने दिलेल्या मार्गसूचीचा अवलंब कोणीही करताना दिसून येत नाही. जनतेच्या दुर्लक्षामुळे संसर्ग वाढतच गेल्यास सरकारला कठोर पावले उचलणे अनिवार्य ठरेल, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
अद्यापही कोरोनाचा धोका टळला नाही. प्रत्येकवेळी जनतेला खबरदारी बाळगण्यास सांगण्यात येत आहे. परंतु जनता बेफिकीरपणे वावरताना दिसत असून आता अंकुश लादल्याशिवाय साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नाही, असे मत व्यक्त केले.
अशाचपद्धतीने सर्व सुरु असल्यास पुन्हा नाईट कर्फ्यू किंवा पार्शियल लॉकडाऊन करण्याची वेळ येईल, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.
आम्ही रात्रीच्या कर्फ्यूबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही; परंतु या निर्णय घेण्यापासून आम्ही काहीच पावले दूर आहोत. ज्याप्रमाणे सरकारची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे जनतेचीही जबाबदारी आहे.
कोविड परिस्थिती हाताळण्यात आणि कोविडवर मात करण्यासाठी जनतेने सरकारने दिलेल्या कोविड मार्गसूचीचे पालन करावे, अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, तर प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील, आणि नियम काटेकोरपणे पाळण्यास भाग पडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.