Saturday, December 21, 2024

/

केवळ राजीनामा नव्हे तर राजकीय संन्यास घेईन-रमेश जारकीहोळी

 belgaum

कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांचा एका महिलेसोबत अश्लील व्हीडिओ काही तासापूर्वी प्रादेशिक कन्नड वृत्त वाहिन्यावर प्रसारित झाला होता त्यावर प्रतिक्रिया देताना रमेश जारकीहोळी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.जर मी यात दोषी आढळलो तर मला फासावर लटकवा त्यासाठी देखील मी तयार असेन असे त्यांनी म्हटले आहे.

मंगळवारी एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जारकीहोळी हे मैसूर दौऱ्यावर होते त्यावेळी सदर व्हीडिओ वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केला ते ऐकून मला धक्काचं बसला होता असं त्यांनी टी व्ही 9 या कन्नड वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

जारकीहोळी पुढे म्हणाले ‘त्या अश्लील चित्रफितीबाबत मला माहिती मिळाली त्यावेळी मी मैसूर येथील चामुंडी मंदिरात होतो त्यावेळी मला धक्काचं बसला मंदिरात देवीसमोर उभे राहता आलं नाही अशी परिस्थिती झाली होती. मी मंदिर सोडून तात्काळ बंगळूरूकडे रवाना झालो होतो मी आता मीडिया सोबत बोलत आहे आता मी दिल्लीकडे रवाना होत आहे.याबाबत मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कल्पना दिली आहे माझी चूक असेल तर कोणत्याही समस्येला तोंड देण्यास तयार आहे.याबाबत मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्याशी देखील माझी चर्चा झाली आहे असे देखील त्यांनी नमूद केले’.

‘तक्रारदार माहीत नाही’

तक्रारदार दिनेश कल्लीहळळी कोण आहे याची कल्पना नाही ज्यांनी कब्बन पार्क पोलिसांत तक्रार दिली आहे गेल्या 21 वर्षा पासून मी राजकारणात आहे आणि आमदारकी भोगत आहे मात्र ही घटना खूप गंभीर बाब आहे तपास पूर्ण होताच सगळं सत्य जनतेसमोर येईल असेही त्यांनी म्हटले.

मी ती चित्रफिती एकदा पहिली आहे पुन्हा एकदा बघणार नाही मी देवाला घाबरणारा माणूस आहे दुसऱ्याला कशाला घाबरू? जर या प्रकरणात माझी चूक आढळली तर फाशी साठी देखील तयार आहे असे ते म्हणाले.

त्या चित्रफिती मधील तरुणीला तुम्ही सरकारी नोकरी देण्याचे आमिष दिले होते का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर जारकीहोळी यांनी आपण सदर मुलीला ओळखत नसल्याचे सांगत चौकशी पूर्ण होऊ द्या. मी माझ्या वकिलांचा सल्ला घेत असून त्या नंतर पुढचे पाऊल उचलणार आहे. या घटनेची चौकशी पूर्ण होऊ द्या जर माझी चूक असेल तर केवळ राजीनामा नव्हे तर राजकारणातून देखील संन्यास घेईन असे देखील जारकीहोळी यांनी म्हटलं आहे.

News courtasy-thebengalurulive.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.