कोरोनाची लाट यायची शक्यता वर्तवली जात असताना बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी कोविड रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.आरोग्य खात्याच्या अधिकृत अहवालात बेळगाव जिल्ह्यात नवीन 24 रुग्णांची नोंद झाली आहे त्यात 17 रुग्ण बेळगाव तालुक्यातील असून त्या पैकी 14 रुग्ण बेळगाव शहर मनपा व्याप्तीतील आहेत.
बेळगाव शहरात सदाशिवनगर मध्ये 7,टिळकवाडी 2,रामतीर्थनगर 2, वडगांव 1,भाग्यनगर 1 आणि रामतीर्थनगर 1 असे रुग्ण आढळले आहेत.
इमारतीत पाच किंवा अधिक कोविद ड रुग्ण असतील तर ती इमारत मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जाणार आहे.यापूर्वी रुग्ण आढळला की इमारत सील केली जात होती पण आता नवीन नियमानुसार इमारत सील केली जाणार नाही.
फक्त त्या इमारतीतील रहिवाशांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे.मायक्रो कंटेनमेंट झोन हे रुग्ण आढळले तर घोषित केले जाणार आहे.इमारत किंवा रस्ता सील पूर्वीप्रमाणे सील केला जाणार नाही.त्या भागातील दैनंदिन व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.