खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी खानापूर येथील लक्ष्मी मंदिर मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड.अरुण सरदेसाई होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक नारायण नागाप्पा पाटील यांनी केले. तालुक्यात युवा समितीची रचना का करावी या संदर्भात त्यांनी विचार मांडले. यावेळी झालेल्या चर्चेत खानापूर तालुक्यात गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन गट झाल्याने मराठी माणूस विभागला गेला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात मराठी माणसाचे नेतृत्व आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यासाठी एक तर खानापूर तालुक्यातील दोन्ही समित्यांनी एकत्रित येऊन तसेच तालुक्यातील मराठी माणसाला एकत्रित आणून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पर्यंत वज्रमूठ कायम ठेवावी. महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समितीची रचना करून या समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील मराठी तरुणांची एकजूट करावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयाला उपस्थित सर्व युवा वर्गाने एकमताने संमती दिली. या बैठकीत आगामी काही दिवसात युवा समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या करीत समन्वय समितीची रचना करण्यात आली. त्यामध्ये समितीमध्ये खानापूर शहर व मराठी भागात येणार्या जिल्हा पंचायत निहाय समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागवार बैठका घेऊन एक व्यापक बैठक खानापुरात बोलावून युवा समिती कार्यकारिणीची घोषणा करण्यात यावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव उपस्थित होते. त्यांनीही युवा समिती रचना करण्यासंदर्भात आपल्या गटाचा संपूर्ण पाठिंबा दर्शविला.
या बैठकीला समिती युवा कार्यकर्ते धनंजय पाटील, राजू कुंभार, रणजीत पाटील, मारुती गुरव, विनोद पाटील, विनोद पाटील, विनायक सावंत, सदानंद पाटील, किशोर हेब्बाळकर किरण पाटील पिराजी कुऱ्हाडे, आनंद मारुती जुंजवडकर, अपन्ना इलान,पुंडलिक पाटील, बाळकृष्ण पाटील, विनायक सावंत, संतोष चिनवल, राजू पाटील, नारायण पाटील, महादेव हटोळकर, स्वागत पाटील, राजाराम देसाई, किशोर हेबाळकर,भूपाल पाटील आदी उपस्थित होते.