महापालिकेसमोर बेकायदेशीर लाल -पिवळा ध्वज हटवावा या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या 5 मराठी भाषिक महिलांनी आज दुपारी आक्रमक पवित्रा घेऊन महापालिकेवर भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच अटकाव करून त्यांना आपल्या ताब्यात घेतले.
महापालिकेसमोर बेकायदेशीर लाल -पिवळा ध्वज हटवावा या मागणीसाठी आज सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे सरदार स्कूल मैदानावरच मोर्चाला सामोरे गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
याचवेळी दुसरीकडे 9 मराठी भाषिक रणरागिनी महिलांनी गनिमी काव्याने बेळगाव पालिकेसमोर भगवा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केला. तथापि महापालिकेच्या ठिकाणी बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनी त्या महिलांना अटकाव करून त्यांना ताब्यात घेतले व माळमारुती पोलीस स्थानकात स्थानबद्ध केलं होतं व सुटका केली.
संबंधित महिलांचा भगवा ध्वज फडकविण्याचा धाडसी प्रयत्न सध्या चर्चेचा तसेच समस्त मराठी भाषिकांनामध्ये कौतुकाचा विषय झाला आहे. जागतिक महिला दिनी या महिलांनी धाडस दाखवत ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला.माजी महापौर सरिता पाटील,माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आदींचा यात समावेश होता.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1340922619598661/
ब्रेकिंग -मनपा समोर भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिसांच्या ताब्यात-मनपा समोर गेल्या होत्या महिला कार्यकर्त्या-
https://www.facebook.com/375504746140458/posts/1340862319604691/