बेळगाव लोकसभा पोट निवडणुकी संदर्भात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही अश्या परिस्थिती मध्ये मराठा बँक आणि मराठा युवक संघ मराठा मंदिर अश्या संस्थामध्ये असलेले बाळासाहेब काकतकर आणि कंपूने राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची भेट घेतली आहे ते ज्या उमेदवारांशी भेटले आहेत त्यांचा शहर महाराष्ट्र एकीकरण समितीशी कोणताही संबंध नाही असा खुलासा शहर समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी केला आहे.
नजीकच्या काळात बाळासाहेब काकतकर आणि त्या कंपूवर कारवाई करण्यात येईल यावेळी नारायण किटवाडकर,शिवाजी हंडे, शिवाजी हंगिरकर,श्रीकांत देसाई यांनी आपण समितीत राहीन असे सांगत काकतकर यांनी मराठा युवक संघाचे काम असल्याचे सांगत दिशाभूल करत त्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांकडे घेऊन गेले होते त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे असाही खुलासा गावडे यांनी केला आहे.
लोकसभा पोट निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार देण्याचे ठरवत असताना काकतकर यांनी भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांची भेट घेऊन अभिनंदन केले होते त्या नंतर काकतकर यांच्यावर चोहो बाजूनी टीका झाली होती त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती त्या नंतर शहर समितीच्या वतीनं हा खुलासा करण्यात आला आहे.
सध्या बेळगावात लोकसभा पोट निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आपली मते राष्ट्रीय पक्षांना बहाल न करण्या ऐवजी शाबूत ठेवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवणार असल्याचे ठरले असताना त्या कंपूने मंगला अंगडी यांचे केलेले कौतुक वादग्रस्त ठरले होते त्या वर आता शहर समितीने देखील खुलासा केला आहे.