महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात ठामपणे बाजू मांडणार आहे, असे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाले असून या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. यावेळी विविध मुद्द्यांसहित राज्यपालांनी सीमाप्रश्नावर देखील आपले मत मांडले.
यावेळी ते म्हणाले, कि महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आजतागायत आपली बाजू ठामपणे मांडत आले आहे. आणि यापुढील काळातही सीमाप्रश्नी ठामपणे आपली बाजू मांडले. राज्यपालांनी मराठी भाषेत केलेल्या भाषणात कर्नाटकातील सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे म्हटले आहे.
‘माझे शासन महाराष्ट्र – कर्नाटक विवादावर सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत आहे’, असे ते म्हणाले. यासोबतच सीमाभागातील मराठी जनतेशी आपण बांधील असून त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धारही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.