तात्कालीन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. भाजप आणि काँग्रेस कडून अजूनही अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही.
भाजप काँग्रेस प्रमाणे सीमाभागातील मराठी जनेतेचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील याबाबत अद्याप हालचाली केल्या नाहीत मात्र युवा समितीने पोट निवडणुकीत उमेदवार देण्याचे ठरवले आहे.रविवारी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीत अध्यक्ष शुभम शेळके यांनी लोकसभा लढवावी असा निर्णय घेण्यात आला त्यानुसार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडे याबाबत अर्ज देण्यात आला आहे.
समिती अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेऊन मध्यवर्ती समितीने शेळके यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे त्यावर दळवी यांनी मंगळवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षात शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली युवा समितीने अनेक लढे आंदोलन यशस्वी केली आहेत जनते मधून शुभम शेळके यांनाच उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी केली जात आहे त्यामुळेच पोट निवडणूक लढवून मराठी मते राष्ट्रीय पक्षांना बहाल न करता शाबूत ठेवली पाहिजे हा मत प्रवाह वाढू लागल्याने युवा समितीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस कडून यमकनमर्डीचे आमदार आणि के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे नाव जवळपास निश्चित झाले मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तर दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या लक्षात घेता अध्याप कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत निर्णय झालेला नाही भाजपकडून मंगळवारी दुपारी पर्यन्त पोट निवडणुकीसाठी कोण उमेदवार असेल याबाबत केंद्रीय नेतृत्व घोषणा करण्याची शक्यता आहे