मंगळवारी लोकसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आचारसंहितादेखील जारी करण्यात आली असून या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना निवडणूक अधिकारी म्हणून कार्य बजावणारे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने बोलाविलेल्या व्हिडीओ चर्चेदरम्यान त्यांनी हि सूचना दिली आहे.
निवडणुकीसाठी याआधीच पथके तयार करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता पालन करण्यासहीत निवडणूक पार पाडण्यासाठी हि पथके सक्रियपणे कार्यरत राहणार आहेत.
८० वर्षांवरील नागरिक, कोविड संसर्गित रुग्ण, तसेच दिव्यांगांना पोस्टल ब्यालेट ची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महानगर पालिका आयुक्त जगदीश के. एच., उपविभागाधिकारी अशोक तेली, अन्न व नागरी पुरवठा मंत्री विभागाचे सहनिर्देशक चन्नबसप्पा कोडली, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सहसंचालक गुरुनाथ कडबूर यांच्यासह विविध विभागाचे जिल्हा पातळीवरील अधिकारी यावेळी उपस्थित होते. चिकोडी, बैलहोंगल उपविभागाधिकारी, तहसीलदार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.