कर्नाटकाच्या राजकारणात सीडी प्रकरणानंतर वेगळेच वारे वाहू लागले असून रमेश जारकीहोळी समर्थकांनी सीआयडी आणि सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यासोबतच रमेश जारकीहोळी निर्दोष असून त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनेही होत आहेत.
रमेश जारकीहोळी यांचे बंधू लखन जारकीहोळी यांनी आपल्या भावाचे राजकीय अस्तित्व सपविण्यासाठी सीडी कारस्थान रचले असल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी रमेश जारकीहोळी यांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी केलेले षडयंत्र यशस्वी होणार नसून यातून निर्दोष सुटण्याचा विश्वास लखन जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे.
बेळगावमधील प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली असून रमेश जारकीहोळी असे काहीही करू शकणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. रमेश जारकीहोळींना सर्वठिकाणी ‘अण्णा’ म्हणजेच मोठया भावाचा दर्जा दिला जातो. त्यामुळे रमेश जारकीहोळी असे काहीच करणार नाहीत, याचा सर्व समर्थकांना विश्वास आहे.
सुरुवातीपासून आम्ही जारकीहोळी बंधू एकत्रित आहोत. आणि जनतेनेही आजपर्यंत आम्हाला भरघोस पाठिंबा दिला आहे. हेही वाईट दिवस निघून जातील, जनतेच्या पाठिंब्याने पुन्हा रमेश जारकीहोळी विजयी होतील, त्यांना माझा नैतिक पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया लखन जारकीहोळी यांनी व्यक्त केली.