जारकीहोळी कुटूंबा विरोधात षड्यंत्र रचले गेले असून तो अश्लील व्हीडिओ राशियामधून सोशल मीडियावर अपलोड झाला आहे त्यामुळे हे प्रकरण चौकशीसाठी सी बी आय कडे सोपवावे अशी मागणी अरभावीचे आंदोलन भालचंद्र जारकीहोळी यांनी केली आहे.
जारकीहोळी कुटूंबा विरोधात मोठे षड्यंत्र रचले गेले आहे या संपूर्ण प्रकरणाची सी बी आय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भालचंद्र जारकीहोळी यांनी केली.
भालचंद्र जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांची भेट घेऊन या प्रकरणाचा सत्यता तपासा अशी मागणी केली.
सदर व्हीडिओ एडिट करून रशिया मधून यु ट्यूब वर अपलोड केलेला आहे नंतर सी डी बनवून माध्यमांना वाटण्यात आली आहे या मागे मोठ्या राजकारण्यांचा हात आहे तो कुणाचा हात आहे हे समोर यायला पाहिजे यासाठी आपण तपास करा अशी मागणी केली आहे.