Wednesday, December 25, 2024

/

जारकीहोळी प्रकरणी ‘नो कमेंट’ : उमेश कत्ती

 belgaum

कर्नाटकात जोरदारपणे सुरु झालेल्या रमेश जारकीहोळी अश्लील सीडी प्रकरणी राजकीय वर्तुळात धावपळ सुरु झाली असून भाजप हायकमांड यावर कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्या जनतेचे लक्ष वेधले आहे.

अचानकपणे बाहेर पडलेल्या या प्रकरणानंतर जनता देखील संभ्रमात पडली असून आहार आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी मात्र यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला आहे.

आज सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांनी उमेश कत्तींना रमेश जारकीहोळी यांच्या प्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता, आपण बंगळूर येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी जात असून रमेश जारकीहोळी प्रकरणी ‘नो कमेंट्स’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांचा पाठलाग सोडवत ते थेट विमानतळावर आत शिरले. यावेळी त्यांनी रमेश जारकीहोळी प्रकरणावर प्रतिक्रिया देणे टाळल्याचे कटाक्षाने जाणवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.