जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या विरोधात कर्नाटक हायकोर्ट बंगलोर येथे दोन पीआयएल दावे दाखल करण्यात आले होते.
ते दावे रद्द करण्यात आले असून पहिला दावा क्रमांक ११३२०/२०२० हा दावा करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश आहे.
१) विठ्ठल बसवाणीप्पा बगेन्नावर २) अल्ताफ ए. बागवान ३)संतोष शंकर वनारसे ४) शिवाजी धाकलू पाटील ५) नागेंद्र आर. माळी ६) शिवाजी कल्लाप्पा हुक्केरी पाटील ७) विनोद वैजू राजगोळकर ८) नारायण लक्ष्मण कदम ९) युवराज सी. मोरे १०) राजू बेळगावकर ११) मोहन जाधव १२) विरुपाक्ष हुच्चननावर १३) अनंत पाटील १४) सुरेश मंडोळकर १५) नुरहमद अजीज कलमनी या पंधरा व्यक्तींनी जय किसान भाजी मार्केट विरोधात दावा दाखल केला होता.
काल कर्नाटक हायकोर्ट बंगलोर येथे हा दावा रद्द करण्यात आला असून दुसरा दावा दाखल करण्यात आला होता, तोही रद्द करण्यात आला आहे. दावा क्रमांक १२२३७/२०२० हा दावा सिध्दरामप्पा कोंडेपूर, वीरप्पा सुभाष देसाई आणि लक्ष्मण मोरे यांनी हा दावा दाखल केला होता. दोन्ही दावे रद्द करण्यात आले असून जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले आहेत.
भाजी मार्केटच्या व्यापारी आणि कामगार वर्गाच्या लढ्याला यश आणि न्याय मिळाला असून पुढील कमला चालना मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.