शेतकऱ्यांसमोर नेहमीच या ना त्या समस्या असतात. परंतु अशा समस्यांवर मात करणारेही अनेक यशस्वी शेतकरी आहेत. यामध्ये राजहंसगड येथील गंगाधर नारायण पवार या शेतकऱ्याचे नाव आहे.
गंगाधर पवार हे सतत शेती आणि दुग्धव्यवसायासंदर्भातील नवनवे प्रयोग करत असतात. सध्या जनावरांच्या खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी आणि दूध उत्पादनात तसेच उत्पन्नात वाढ होण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात ऍझोला फार्मिंगचा यशस्वी प्रयोग केला आहे.
पवार ऍग्रो फार्म या त्यांच्या शेतात त्यांनी हा प्रयोग राबविला आहे. दूध वाढत नाही, दुधाला फॅट लागत नाही आणि पर्यायाने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ऍझोला फार्मिंगचा उपाय काढला आहे.
धाळ जनावरांच्या खुराकावरचा खर्च कमी करण्याचा सोपा पर्याय म्हणजे ऍझोलाचा वापर. ऍझोला ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती आहे. जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा पूरक म्हणून वापर करण्यात येतो. ऍझोलाचे उत्पादन अत्यंत कमी जागेत घेता येते . शिफारशीत प्रमाणात जनावरांच्या आहारात ऍझोलाचा वापर फायदेशीर ठरतो.
गंगाराम पवार यांनी सर्वप्रथम मातीविना चारा कसा तयार करायचा यासाठी हैड्रोफोनिक पद्धतीने मक्का उत्पादन करून चाऱ्याच्या खर्चात बचत केली.
आणि आता पुन्हा जनावरांसाठी चारा म्हणून ऍझोला शेतीचा यशस्वी प्रयोग करून शेतकऱ्यांना नवीन दिशा दिली आहे. ऍझोला या शेतीसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास गंगाराम पवार यांच्या राजहंसगड येथील पवार ऍग्रो फार्म ला भेट द्या अथवा ७२०४०४६४९३ या क्रमांकावर संपर्क साधा. आणि आपल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवा.