कार्यक्रम – जत्रेसाठी उपअधीक्षक, सहाय्यक-निवडणूकअधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक- कोविड -19 संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना विविध कार्यक्रम आणि जत्रा-यंत्रांसाठी परवानगी देण्यासाठी आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार विविध संघटना, संस्थानचे कार्यक्रम करण्यापूर्वी तसेच आगामी जत्रा, यात्रांचे नियोजन करणाऱ्या देवस्थान मंडळींनी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
संबंधित संघ, संस्था, देवस्थान मंडळींना सदर कार्यक्रम आयोजिण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देणे गरजेचे होते. परंतु बेळगाव हा जिल्हा मोठा असल्यामुळे प्रत्येक अर्जावर परवानगी देणे, मुश्किल होत होते. दूरवरून येणाऱ्या अर्जदारांना परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठणे अडचणीचे ठरत होते.
याचा विचार करून अर्जदारांच्या हिताच्या दृष्टीने आणि सोयीसाठी संबंधित विभागातील निवडणूक अधिकारी, तसेच विशेष अधिकारी यांच्यामार्फत परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले आहेत.