महाराष्ट्र, केरळसह आता कर्नाटकातदेखील कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याची निदर्शनास येत आहे. आज बेळगाव जिल्ह्यात पुन्हा ३६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, अशी माहिती राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर २४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अद्याप २१३ रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण ३४४ मृतांची संख्या नोंदविण्यात आली आहे. कर्नाटक राज्यात गेल्या २४ तासात ३०८२ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. बेळगाव जिल्ह्यात १९ मार्च रोजी एकदिवसात ३७ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज ३६ रुग्णांची नोंद झाली आहे. मार्च २०२१ मधील कोरोनाग्रस्त रुग्णांचा हा दुसरा उच्चांक आहे. गेल्या ७ दिवसांमध्ये १३९ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे.
मला बेळगाव लाईव्ह चा व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं आहे.