शेजारील राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असतानाच कर्नाटकात देखील पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. बेळगाव जिल्ह्यातदेखील हळूहळू कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्याचे निदर्शनास येत असून आज नव्या २० कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे.
राज्यासह बेळगाव जिल्ह्यातदेखील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु अचानकने महाराष्ट्र आणि केरळमध्ये पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आणि याचे परिणाम कर्नाटकात देखील जाणवू लागले आहेत.
जिल्ह्यात एकूण २० रुग्णांची भर पडली असून यापैकी १५ रुग्ण बेळगाव तालुक्यातील आहेत. तर गोकाक मधील १ आणि चिकोडी मधील ४ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीननुसार बेळगाव जिल्ह्याची कोविड आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या : २७२०४
एकूण नमुने घेण्यात आलेली संख्या : ५५७७९१
रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल असलेले रुग्ण : १८६
एकूण कोरोनाग्रस्त मृतांची संख्या : ३४२
कोरोनामुक्त रुग्णांची संख्या : २६६७६