माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या विरुद्ध सी डी प्रसिद्ध केलेले मानव हक्क होराट समितीचे दिनेश कलहळळी यांनी कब्बन पार्क पोलिसांत दाखल केलेली तक्रार वापस घेतल्याच्या पाश्वभूमीवर अरभावीचे आमदार, व रमेश यांचे भाऊ भालचंद्र जारकीहोळी यांनी वक्तव्य केले आहे.
सी डी मधील महिलेला पीडित असा उल्लेख करू नका अशी विनंती भालचंद्र यांनी माध्यमाना केली आहे कारण या प्रकरणी मोठे षडयंत्र असून रमेश जारकीहोळी यांनी कोणतीही चूक केली नाही त्या महिलेच्या मागे आणखी तिघे जण आहेत त्यासाठी त्यांनी 15 कोटी रुपये खर्च केलेत असा आरोप त्यांनी केला आहे.
रमेश जारकीहोळी यांनी घरा बाहेर पडून जनतेला खरी माहिती द्यावी तक्रार देण्या आधीच व्हीडिओ यु ट्यूब ला अपलोड झाला होता यावर त्यांनी तक्रार द्यावी असेही ते म्हणाले.
कलहळळी यांना कुणीतरी मिस गाईड केलं असावं पोलिसांत तक्रार देण्या आधी रशियातून हा व्हीडिओ अपलोड झाला होता त्यांनी तक्रार मागे घेतली आहे मात्र या प्रकरणी मोठे षडयंत्र रचले गेले आहे.
बेळगाव लोकसभा पोट निवडणूक पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर जारकीहोळी कुटुंबाला संपवण्याचा कट रचून रमेश याना मंत्री पदावरून पायउतार करावे हा उद्देश्य होता याची सी बी आय चौकशी झाली पाहिजे असे ही त्यांनी नमूद केले.