Saturday, November 16, 2024

/

रमेश जारकीहोळी यांच्या प्रचार सहभागाबद्दल प्रल्हाद जोशींचे स्पष्टीकरण

 belgaum

कर्नाटकातील राजकारणात रमेश जारकीहोळी यांच्यासंदर्भात अश्लील सीडी प्रकाशित झाल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला आहे. त्यातच बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

कर्नाटकासह बेळगावच्या राजकारणातील महत्वाचा घटक असणारे रमेश जारकीहोळी यांचा भाजप उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभाग असेल कि नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बेळगावमधील सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

सीडी प्रकरणात सहभागी असलेली युवती सातत्याने एकच विधान करत आहे. त्यासोबत युवतीच्या पालकांनतर्फेही एकच विधान करण्यात येत आहे. सदर युवती ऑडिओ, व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी जाहीर करत आहे. त्या युवतीने सर्वांसमोर येऊन जाहीरपणे गोष्टी सांगाव्यात, असे प्रल्हाद जोशी म्हणाले.

या प्रकरणात रमेश जारकीहोळी यांचे नाव आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारात सहभागी व्हावे, न व्हावे हा निर्णय सर्वस्वी पक्षाचा आहे. प्रचारात प्रत्येक आमदाराने सहभागी होणे गरजेचे आहे. परंतु रमेश जारकीहोळी यांनी प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय हा पक्षाचा असल्याचे प्रल्हाद जोशींनी स्पष्ट केले.

सीडी प्रकरणात डीकेशींचेही नाव आले आहे. परंतु नाव आल्यावर प्रत्येकाला अटक करणे शक्य नाही. याप्रकरणी चौकशी साठी एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटी पथक उत्तमरीत्या चौकशी आणि तपास करत आहे. तपासाअंती सर्व काही निष्पन्न होईल. याप्रकरणी तर्क आणि अंदाज वर्तविणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.