Saturday, December 7, 2024

/

अखेर ‘त्या’ तरुणीचा जबाब नोंदवला!

 belgaum

रमेश जारकीहोळी आणि संबंधित तरुणी संदर्भातील अश्लील सीडी प्रकरण बाहेर पडले आणि त्यानंतर कर्नाटकाच्या संपूर्ण राजकारणात मोठा बदल घडला. या सीडी प्रकरणी एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली असून त्या सीडीप्रकरणी अखेर संबंधित तरुणीने बंगळूर येथील वसंत नगरातील विशेष न्यायालयात आपला जबाब नोंदवला.

सदर सीडी प्रकरणातील तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर मंगळवारी सुनावणीसाठी ती हजर राहिली, अशी माहिती तिचे वकील जगदीशकुमार यांनी दिली. ती तरुणी न्यायालयात येणार असल्याचे समजल्यामुळे प्रसारमाध्यमांनी एकच गराडा घातला होता. पोलिस बंदोबस्तही मोठा होता. अखेर प्रसारमाध्यमांची नजर चुकवून त्या तरुणीने विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर आपला जबाब नोंदवला. अन्य कोणालाही सुनावणी दरम्यान प्रवेश देण्यात आला नाही.

बंगळुरूच्या वसंतनगर येथील गुरुनानक भवन येथे विशेष कोर्टाच्या सभागृहात एका महिला टायपिस्टसह एसीएमएम न्यायाधीशांनी त्या पीडित युवतीचे वक्तव्य नोंदवले आहे. बुधवारी पुन्हा या युवतीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी तरुणीची पुन्हा चौकशी करण्यात आली. सीआरपीसी कलम-164 अन्वये युवतीचे विधान नोंदविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर एसटीआयटी अधिकार्‍यांनी सदर तरुणीची चौकशी देखील केली आहे.

यावेळी न्यायालयाने रमेश जारकीहोळींची ओळख कशी, कुठे आणि कधी झाली? त्यांचा मोबाईल नंबर कुणी दिला? आणि सदर प्रकरण केव्हा घडले? सोशल साईटवर व्हिडीओ कसा अपलोड झाला? असे अनेक प्रश्न युवतीला विचारले. यावेळी सदर युवतीने संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर मांडल्याची माहिती मिळाली आहे. आपण एका डॉक्युमेंट्री साठी राज्यातील धरणांची पाहणी करण्यासाठी आणि चर्चा करण्याच्या हेतूने जुलै मध्ये रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली. जुलै महिन्यात रमेश जारकीहोळी यांच्यासह धरणांना भेट दिली. त्यानंतर विधानसौधमध्ये आपल्याला जावे लागले. दुपारी ३.३० चा पास देण्यात आला.

तो पास घेऊन मी विधानसौधमध्ये प्रवेश घेतला. अशापद्धतीने एकदिवस रमेश जारकीहोळी यांनी आपला मोबाईल नंबर मला दिला. कुणालाही याबाबत न सांगण्याच्या अटीवर त्यांनी आपला मोबाईल नंबर मला दिला. मल्लेश्वर पीजी अशा नावाने मोबाईल नंबर सेव्ह करून घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी सलगी करणे सुरु केले. डॉक्युमेंटरी बनविण्याच्या उद्देशाने माझ्यासोबत दोन ते तीनवेळा शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. यावेळी मी विरोध करू शकले नाही, यालाही काही करणे आहेत, असे त्या युवतीने सांगितले.

रमेश जारकीहोळी हे आमच्या प्रभागातील प्रभावी व्यक्तिमत्व आहेत. त्यांना विरोध कसा करायचा याची मला भीती होती. माझ्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या भीतीपोटी मी विरोध करू शकले नाही. हि गोष्ट मी माझ्या आईला देखील सांगू शकले नाही. माझ्यासोबत घडलेल्या प्रकारचा व्हिडीओ कुणी काढला, हेदेखील मला माहित नाही. तो व्हिडीओ कुणी सोशल मीडियावर व्हायरल केला हेदेखील मला माहित नाही. माझ्यासोबत झालेला प्रकार मी माझा मित्र श्रवण ज्याच्याशी माझी व्हीटीयूमध्ये मैत्री झाली, त्याला सांगितला आहे. श्रवणची नरेश अण्णांनादेखील ओळख करून दिली आहे. परंतु आपल्याकडे आपल्यावर अन्याय झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याने मी आवाज उठवू शकले नाही, असे त्या युवतीने स्पष्ट केले आहे. माझ्या जीवाला धोका असल्याचे मला जाणवले त्यामुळे मी आरटी नगरमधील एका पीजीमध्ये सदर व्हिडीओ ठेवला होता. त्याची आणखी एक कॉपी नरेश अण्णांना दिली होती. परंतु तो व्हिडीओ कुणी व्हायरल केला, हे मला माहित नसल्याचे युवतीने सांगितले. या चौकशीदरम्यान सदर युवतीने आपला प्रियकर आकाशचे देखील नाव घेतले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.