बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंळवारपासून प्रारंभ झाला असून बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
व्यंकटेश्वर महास्वामीजी आणि श्रीकांत पडसलगी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवाय व्यंकटेश्वर महास्वामीजी यांच्या अर्जावर रमेश जारकीहोळी आणि डॉ. प्रभाकर कोरे यांची सूचक आणि अनुमोदक म्हणून नावे आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. के हरीश कुमार यांना उमेदवारी अर्ज स्विकारला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये अनेक बदल करण्यात आले असून उमेदवारी अर्ज दाखल जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष तयार करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी तसेच त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी लागू असलेल्या करण्यात येणार आहे. जमावबंदी लागू असलेल्या ठिकाणी 5 पेक्षा अधिक जण किंवा मिरवणूक, सभा आयोजित करण्यास निर्बंध असणार आहेत.