Thursday, December 26, 2024

/

पोहावयास गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

 belgaum

जुने बेळगाव येथील तलावाशेजारी असलेल्या विहिरीमध्ये पोहावयास गेलेले एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

विनायक ज्योतिबा हरणी (वय 12 वर्षे, रा. ब्रह्मदेवनगर, धामणे रोड, बेळगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नांव आहे. विनायक हा आज सकाळी आपल्या मित्रांसमवेत जुने बेळगाव येथील तलावाशेजारी असलेल्या विहिरीमध्ये पोहावयास गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती सकाळी 9 वाजता मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि विनायक याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडला आहे. शहापूर पोलिस स्थानकामध्ये घटनेची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.