Sunday, December 22, 2024

/

पोट्रेट पेंटिंगला प्रतिसाद

 belgaum

बेळगावचे प्रसिध्द चित्रकार किरण हणमशेट यांच्या पोर्ट्रेट पेंटिंगचे प्रात्यक्षिक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते.या प्रात्यक्षिकाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

सिक्वेन्स डिझाईन स्टुडिओ तर्फे या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी दहा वाजता प्रात्यक्षिकाला प्रारंभ झाला. तरुण चित्रकारांना मार्गदर्शन मिळावे आणि चित्रकलेतील बारकावे समजावेत या उद्देशाने प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.Potrait painting

किरण हणमशेट यांनी चित्रकलेचे शिक्षण के.बी.कुलकर्णी यांच्याकडे घेतले आहे.सध्या ते जे.एन.भंडारी स्कूल ऑफ आर्ट्स येथे अध्यापनाचे कार्य करतात.देशातील अनेक शहरात त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आहेत.आजवर अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.

रविवारी एका नामवंत चित्रकाराचे प्रात्यक्षिक सिक्वेन्स डिझाईन स्टुडिओ येथे आयोजित करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिकाच्या वेळी नामवंत चित्रकरांशी संवाद साधण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.प्रात्यक्षिक झाल्यावर अनेक तरुण चित्रकार आणि मान्यव रानी चित्रकार किरण हणमशेट यांच्याशी संवाद साधला.

https://www.instagram.com/p/CMrkuYQhuLW/?igshid=1l70fz8xl0kip

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.