भाषिक अल्पसंख्याक फेडरेशन महामंडळ, कर्नाटक बेळगावच्यावतीने बेंगलोर भेटीत आमदार अरुण शहापूरांच्या नेतृत्वाखाली रोस्टरसह विविध मागण्यांसाठी शिक्षणमंत्री एस सुरेश कुमार यांची विधानसभेत भेट देऊन निवेदन देण्यात आले.
शिक्षण सचिवांच्या उपस्थितीत शिक्षक आमदार अरुण शहापूर यांनी आज पर्यंतच्या सर्व अडचणींची सर्व माहिती सांगितली. स्वतःच्या प्रयत्नाबरोबर भाषिक अल्पसंख्याक फेडरेशन महामंडळ त्याच बरोबर कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाने चालविलेल्या प्रयत्नांची चर्चा केली जर रोस्टर पद्धत उठविली नाहीतर संस्था चालवणं अवघड जाणार त्याच बरोबर सध्या कर्तव्य बजावत असलेले शिक्षक यांचा संसार चालविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काहींच वयही निघून गेल आहे आणि जात आहे त्यामुळे सरकारने या आधी दिलेल्या आश्वासनाचा विचार करुन, कोर्टाच्या आदेशाचं पालन केल्यास शिक्षण संस्थाना तसेच शिक्षकांना त्याचा फायदा होणार आहे.
हा विषय गंभीरतेने घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा असे आमदारांनी सांगितले. शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर शिक्षणमंत्र्यांनी मुद्देसूद हितगूज केली आणि या अधिवेशनातचं हा विषय निकालात काढला जाईल यांची ग्वाही दिली. कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने वारंवार निवेदन दिल्याचे आणि अरुण शहापूर यांच्या प्रयत्ना बद्दल बेळगाव जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील यानीही स्पष्ट केले.
यावेळी दक्षिण महाराष्ट शिक्षण मंडळाचे संचालक पी पी बेळगाव, फेडरेशनचे उपाध्यक्ष सी ई धुमाळ, सचिव पिराजी मजुकर, मार्कंडेय हायस्कूलचे संचालक,कायदे तज्ञ एम जी पाटील,लोंढा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नेसरीकर,विनय महाळंक,मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुरेश कळेळकर, विश्वभारत सेवा समितीचे संचालक सागर नंद्दीहळ्ळी, किसान प्रसारक मंडळ,भालकी,बिदरचे प्रा.धोंडीराम बिरादर, संतोष मेलगे उपस्थित होते.