Saturday, April 27, 2024

/

बससेवा ठप्प; वातावरण तणावपूर्ण!

 belgaum

सीमाभागातील मराठी भाषिकांबाबतीत प्रशासन आणि पोलीस विभागाचा नेहमीच दुटप्पीपणा असतो. कोणत्याही बाबतीत कायदा आणि सुव्यस्थेचे शहाणपण केवळ मराठी भाषिकांना वाटणाऱ्या प्रशासन आणि पोलीस विभागानंतर आता कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणच्या डॉ. सोमशेखर यांनीदेखील शिवसेनेवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून बेळगावमध्ये कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांचा धुडगूस सुरु आहे. मराठी द्वेषाने उफाळून आलेल्या कन्नड संघटनांनी सीमाभागातील शांततापूर्ण वातावरण भंग केले असून अनेक मराठी फलकांवर काळे फासण्याचा अश्लाघ्य प्रकार केला आहे.

याचे पडसाद महाराष्ट्रात पडत असून कोल्हापूरमधील फलकांवर कन्नड भाषेत असणाऱ्या मजकुरावर काळे फासण्यात आले आहे. यावर सी. सोमशेखर यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्रित येऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचा सल्ला सोमशेखर यांनी दिला आहे. कोल्हापूरमध्ये बसेसवर दगडफेकीचा प्रकार झाला.Kop bus stand

 belgaum

शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं.

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात आज सकाळी कर्नाटक ला जाणाऱ्या हुबळी, बेळगाव ,सौंदत्तीसह या बसेस नसल्यामुळे कर्नाटक प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट पहायला मिळाला.

दररोज बेळगाव बस डेपो मधून 69 बस गाड्या कोल्हापूर मधून महाराष्ट्रात जात असतात तर उत्तर कर्नाटक वायव्य परिवहन मंडळाच्या एकूण 169 बस महाराष्ट्रात येत असतात अशी माहिती वायव्य परिवहन खात्याचे बस रहदारी नियंत्रक लमानी यांनी दिली. कोल्हापूर बस डेपो प्रमुखांनी तणावाचे वातावरण असल्याची माहिती देताच बेळगाव पोलीस खात्याच्या सुचने वरून आम्ही शनिवारी बस बंद केल्या आहेत वातावरण पाहून उद्या बस सुरू करू असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.