Friday, April 19, 2024

/

माजी नगरसेवकांनी दिले जारकीहोळींसंदर्भात निवेदन

 belgaum

रमेश जारकीहोळी यांच्यासंदर्भातील सीडी प्रकरणी विविध समर्थकांसह आता बेळगावच्या काही माजी नगरसेवकांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

रमेश जारकीहोळी निर्दोष असून त्यांची बदनामी करण्याचे कारस्थान रचले जात असून, या प्रकरणात सामील असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काही माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या संदर्भातील एक अश्लील सीडी प्रसिद्ध करण्यात आली आहे. रमेश जारकीहोळींना या प्रकरणात गोवण्यात येत असून ते निर्दोष आहेत. त्यांच्या संदर्भात असलेली सीडी हि बनावट असून याप्रकरणी त्यांच्याविरोधात बदनामीचे कारस्थान रचले जात आहे.Ex corporator

 belgaum

अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टीत जारकीहोळी सामील नसून त्यांच्याबाबत झालेल्या आरोपांची चौकशी व्हावी, आणि अशापद्धतीने गैरसमज पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

यावेळी माजी महापौर बसाप्पा चिकलदिनी, माजी महापौर किरण सायनाक यांच्या नेतृत्वाखाली रवी अत्रे, शिवा चौगुले, रमेश कळसन्नवर, रमेश सोनटक्की आदींनी निवेदन सादर करून मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.