Thursday, November 14, 2024

/

नव्याने आढळले 3 रुग्ण : 5,47,104 जणांचे निरीक्षण पूर्ण

 belgaum

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात फक्त बेळगाव तालुक्यात नव्याने 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,065 झाली आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 5 लाख 47 हजार 104 जणांचे वैद्यकीय निरीक्षण पूर्ण झाले आहे.

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज सोमवार दि. 15 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 5,47,104 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 17,997 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 102 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 26,158 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,02,847 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 5,46,012 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,065 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज सोमवारी नव्याने आढळलेल्या 3 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,15,028 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 102 आहेत. त्याचप्रमाणे 951 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 342 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,621 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज सोमवारी आढळलेले सर्व 3 कोरोनाग्रस्त रुग्ण बेळगांव तालुक्यातील आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.