Tuesday, December 31, 2024

/

उमेदवारी घोषणेची उत्कंठा शिगेला

 belgaum

लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा प्रत्येक इच्छुक उमेदवारासह जनता देखील करत होती. निवडणूक तारीख जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याचीही उत्सुकता तितकीच वाढली होती. येत्या 17 एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे या दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

निवडणूक तारीख जाहीर झाल्यानंतर लगेचच अधिकृत उमेदवांची नावे घोषित होण्याची शक्यता होती. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची घोषणा शनिवार रात्री किंवा रविवारी होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारांच्या रांगेत डॉ. रवी पाटील, माजी आमदार संजय पाटील, महांतेश कवटगीमठ, शंकरगौडा पाटील,  डॉ. प्रभाकर कोरे, रमेश कत्ती, श्रद्धा शेट्टर,रमेश देशपांडे, मंगला अंगडी ,किरण जाधव यांच्यासह अनेक इच्छुकांची यादी भारतीय जनता पक्षाकडे आहे. कुणाला उमेदवारी जाहीर केली जाणार आणि भाजपकडून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय जनता पक्षातील अनेक इच्छूक उमेदवार गेल्या एक आठवड्यापासून दिल्ली मुक्कामी आहेत. सध्या भाजपकडून बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी रवी पाटील, श्रद्धा अंगडी यांचे नाव चर्चेत आहे. दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांची ती कन्या असून भाजपचे कर्नाटकमधील माजी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांची ती सून आहे. त्याचबरोबर आरएसएस संबंधित काही नावही भाजपकडून चर्चेत आहेत.

भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर लागलीच काँग्रेसकडूनही उमेदवारी घोषित केली जाण्याची चर्चा आहे. काँग्रेसतर्फे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक इच्छुकांची नवे चर्चेत आहेत. बेळगावमधील राजकीय वातावरण आणि गेल्या चार लोकसभा निवडणुकीत भाजपाचीच सत्ता बेळगाववार असल्याने काँग्रेसतर्फे तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यास काँग्रेस प्रयत्नशील आहे.

सध्या बेळगावमध्ये सुरु असलेले मराठी विरुद्ध कन्नड आंदोलन, या आंदोलनादरम्यान राष्ट्रीय पक्षांची भूमिका आणि इतर बाबतीत बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत जोरदार रस्सीखेच ठरणार आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी बैलहोंगल आणि बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर उर्वरित 6 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पोटनिवडणुकीत मराठी भाषिक नेमकं काय करणार, याकडे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचंही लक्ष असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.