ग्रामीण भागातून जनावरे चोरून त्यांच्यामार्फत येणाऱ्या उत्पादनाचा लाभ घेणाऱ्या जोडगोळीला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ गायी आणि ५ म्हशी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती आधी कि, ग्रामीण भागातून गेल्या काही दिवसांपासून जनावरे चोरीला जाण्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत पोलीस लक्ष ठेऊन होते. दरम्यान हंगरगा येथील दोन आरोपींना याबाबत अटक करण्यात आली आहे.
सुरेश पाटील (वय ३२) आणि गणेश नायक (वय २७) (दोघेही राहणार हंगरगा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याजवळील ५ गायी आणि ५ म्हशी अशी सुमारे ९ लाख रुपये किमतीची १० जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत.
जनावरांची चोरी करून त्यांच्यामार्फत मिळणारे दूध आणि संबंधित उत्पादनाचा फायदा हे दोघेही घेत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना डीसीपी विक्रम आमटे म्हणाले, जनावरे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे इन्स्पेक्टर सुनीलकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली असून त्यांच्याजवळील १० जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत. यामधील २ गायी या गीर या जातीच्या आहेत तर ३ मढी मुर्रा या जातीच्या आहेत. जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनासह या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमधील सुरेश पाटील याने डेरी डिप्लोमा शिक्षण घेऊन दुग्ध व्यवसायाचेही शिक्षण घेतले आहे.