बॉडी बिल्डिंग क्षेत्रात अभ्यासक्रम आणि संशोधन पूर्ण करून त्याच क्षेत्रातील देशातील पहिली पीएचडी बेळगावमधील अमित जडे यांनी पटकाविली आहे. के.एल.एस. गोगटे पीयू महाविद्यालयाचे राष्ट्रीय स्तरावरील माजी शरीरसौष्ठव व शारीरिक शिक्षण संचालक अमित जडे यांनी शरीरसौष्ठव या विषयामध्ये पीएचडी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
रेल्वे बॉडी बिल्डींग टीमचे कोच, रेल्वे अधिकारी सुनील आपटेकर यांचे ते शिष्य होत. बॉडीबिल्डर्स, एचडीएल आणि एलडीएल पातळीवरील एन्डोमॉर्फ प्रकार बॉडीबिल्डर्सच्या प्रभावाचा आहार आणि वजन प्रशिक्षण या विषयावरील संशोधन पूर्ण करून त्यांनी हि पदवी प्राप्त केली आहे. शरीरसौष्ठव क्षेत्रातील देशातील पहिली पदवी जडे यांनी पटकावून बेळगाव जिल्ह्याच्या नावावर मानाचा तुरा रोवला आहे. व्हीटीयू मधून त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून दीक्षांत समारंभात त्यांना हि पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शारीरिक शिक्षण विभागाकडून बॉडीबिल्डिंग क्षेत्रात कर्नाटकातील व्हीटीयू विद्यापीठाचे अमित जडे हे पीएचडीचे पहिले पुरस्कारप्राप्त खेळाडू असल्याने विद्यापीठासाठी हा क्षण ऐतिहासिक असेल. बॉडीबिल्डिंगवर पीएचडी करणारे भारतातील पहिले शारीरिक शिक्षण संचालक आहेत. इतकेच नव्हे तर बॉडीबिल्डिंग क्षेत्रात या कामगिरीसाठी प्री-युनिव्हर्सिटीमधील पहिले फॅकल्टी तसेच बॉडीबिल्डिंग ऑफिसरमधील ते पहिले प्राध्यापकही आहेत.
त्यांना डॉ. जी. बुजुर्के (VTU बेळगाव येथील शोध मार्गदर्शक, भौतिक शिक्षण संचालक एसडीएम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, धारवाड), डॉ. एम. ऑगस्टीन ज्ञानरज, (प्राध्यापक व निदेशक, भौतिक शिक्षण विभाग व स्पोर्ट्स सायन्स, अन्नामलाई विद्यापीठ), डॉ. रोहित मुटेकर, (जीओए इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सांकेलीम, जीओए), दिनेश वेर्नेकर, शुभम एरिएच, महेश कांत्राटे (केएलई हॉस्पिटल, बेळगाव कडून केंद्रीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान), सुनील एन आपटेकर, रणजित के किल्लेकर, (आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर आणि नॅशनल ज्युड ऑफ आयबीएफ), अजित सिद्दनवर (बॉडीबिल्डिंग आंतरराष्ट्रीय न्यायाधीश), प्रकाश पुजारी (बॉडीबिल्डिंग राष्ट्रीय न्यायाधीश) यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शरीरसौष्ठव क्षेत्रात त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.