Sunday, May 5, 2024

/

‘अलाईन्स’ची पुणे विमान सेवा 28 पासून पुनश्च होणार सुरू

 belgaum

एअर इंडियाची उपकंपनी असणाऱ्या अलाईन्स एअरतर्फे येत्या 28 मार्च 2021 पासून बेळगावला जोडणारी हैदराबाद ते पुणे ही थेट विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.

अलाईन्सची पुणे आणि बेळगावाला जोडणारी थेट विमानसेवा यापूर्वीच सुरू झाली आहे. आता या नव्या विमान सेवेमुळे बेळगाव आणि पुणे येथील प्रवाशांना पुढील प्रवासासाठी एकाधिक पर्याय उपलब्ध झाला आहे.

अलाईन्स एअरचे विमान क्र. 91 561 हैदराबाद येथून सकाळी 6:55 वाजता प्रस्थान करेल आणि 8:35 वाजता पुण्याला पोहोचेल. तसेच पुणे येथून सकाळी 9:05 वाजता प्रस्थान करणाऱ्या या विमानाचे बेळगाव येथे सकाळी 10:25 वाजता आगमन होईल.

 belgaum

विमान क्र. 91 562 बेळगाव विमानतळावरून 10:50 वाजता प्रस्थान करेल आणि पुणे विमानतळावर 11:55 वाजता या विमानाचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी 12:35 वाजता पुणे येथून प्रस्थान करून दुपारी 01:42 वाजता हे विमान हैदराबादला पोहोचेल. या पद्धतीने अलाईन्स एअरची ही नवी विमानसेवा तीनही शहरांमध्ये अखंड कनेक्टिव्हीटी ठेवू शकणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.