केंद्र सरकारने जारी केलेल्या कृषी विधेयक विरोधात बेळगावमध्ये ३१ मार्च रोजी रयत महापंचायतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चुक्की नंजुडस्वामी यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली.
गृहमंत्री अमित शहा यांच्या बेळगाव भेटी दरम्यान शेतकऱ्यांना अधिवेशनात सहभागी होण्याची संधी देण्यात आली. परंतु कृषी विधेयक हे केवळ बेळगाव जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी बनविण्यात आले आहे. या विरोधात ३१ मार्च रोजी महापंचायत समावेश समारंभ चन्नम्मा सर्कल येथे आयोजित करण्यात आला आहे, असे चुक्की नंजुडस्वामी यांनी सांगितले.
केंद्र सरकारने जारी केलेले कृषी विधेयक मागे घेण्यात आले नाही, तर पुढील काळात जेल भरो आंदोलन देखील छेडण्याचा इशारा नंजुडस्वामी यांनी दिला. दिल्ली येथे शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे.
केंद्र सरकारने जारी केलेले विधेयक हे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे आहे. हे विधेयक रद्द करण्यात न आल्यास संपूर्ण देशव्यापी आणि अधिक उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला शेतकरी नेते आणि अनेक शेतकरी उपस्थित होते.