कर्नाटक राज्य शासनाने यंदाच्या इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री के. सुधाकर दिली आहे. इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे विद्यार्थी परीक्षा न देताच पुढच्या वर्गात जाऊ शकणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला नसून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, गृहमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय कळविण्यात येणार आहे.
रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कि कर्नाटकात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. शासनाने कोविड पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. मात्र पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत सतर्क राहावे. अनेकांची मते जाणून घेऊन हा निर्णय घेण्यात येणार असून लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सादर निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.