शुक्रवारी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी पत्रकार परिषद घेत देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली निवडणूक प्रक्रिया जाहीर केली मात्र बेळगावच्या पोट निवडणुकीबाबत त्यानी सांगितल्या नुसार अद्याप नवीन निवडणूक प्रेस रिलीज आली नाही त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची वाट पहात असणाऱ्याना अजून वाट पहावीचं लागली.
पाच राज्याची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी बेळगाव आणि तिरुपती या दोन लोकसभा पोट निकडणुकीची घोषणा निवडणूक अधिकारी सिन्हा वेगळं पत्रक काढून माहिती देतील अशी स्पष्ट माहिती दिली होती त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा बेळगाव पोट निवडणुकीची नोटिफिकेशन जाहीर होईल अशी शक्यता होती मात्र शनिवारी दुपार पर्यन्त देखील बेळगाव निवडणुकीची घोषणा झाली नव्हती.
बेळगावची पोट निवडणूकीचे मतदान विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होईल अशी शक्यता होती मात्र अद्याप घोषणा न झाल्याने साऱ्यांचे लक्ष निवडणूक आयोगा कडून जाहीर होणाऱ्या त्या प्रेस रिलीज कडे लागली आहे.
पोटनिवडणूक होणार निश्चित मात्र मतदानाची तारीख कधी ते अधिकृतरित्या जाहीर झाल्यावर कळणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय बेळगावशी संपर्क साधला असता प्रशासनाने निवडणुकीची सगळी तयारी पूर्ण केली यंत्रणा सज्ज आहे मात्र अजून पोट निवडणुकीचे नोटिफिकेशन अजून आले नसल्याची माहिती दिली.