सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या सवसाधारण सभेकडे संपूर्ण सीमावासियांच्या लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत येळ्ळूर ग्रामपंचायतीवर नेहमीप्रमाणेच महाराष्ट्र एकीकरण समितीचेच वर्चस्व टिकून राहिले असून या पंचायतीची निवडणुकीनंतरची पहिली सर्वसाधारण सभा १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
परंपरेनुसार ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या बैठकीत सीमाप्रश्नी ठराव मांडण्यात येतो. गेल्या ६५ वर्षांपासून येळ्ळूर ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचीच सत्ता आहे. आणि परंपरेनुसार आजतागायत ग्रामपंचायत सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या बैठकीत सीमाप्रश्नी ठराव मांडण्यात येतो.
त्यानुसार बुधवार दि. १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत सीमाप्रश्नी ठराव मांडला जाणार का? आणि हि परंपरा जपली जाणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
गामपंचायत अध्यक्षपदी सतीश पाटील यांची निवड झाल्यानंतर ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना त्यांनी परंपरेनुसार सीमाप्रश्नी ठराव मांडण्यात येणारच असा निर्धार बोलून दाखविला होता. शिवाय महाराष्ट्र एकीकरण समिती व्यतिरिक्त येळ्ळूरमध्ये कोणत्याही इतर पक्षाला स्थान नसल्याचेही त्यांनी बोलून दाखविले होते. शेवट्पर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीशीच एकनिष्ठ राहून येळ्ळूरचा बालेकिल्ला नेहमी अभेद्य राखण्यात येईल, असा भरवसाही सतीश पाटील यांनी बेळगाव लाईव्ह शी बोलताना व्यक्त केला.
गुरुवारी होणाऱ्या येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीत हा ठराव मांडण्यात येईल का? या साऱ्याकडे समस्त सीमावासियांच्या लक्ष लागले आहे.