सदाशिवनगर येथे एपीएमसी पोलीसांनी एका वेश्या व्यवसायावर धाड टाकून दोन तरुणींचे रक्षण केले. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी उत्तर प्रदेश मधील एका युवतीच्या घराचा शोध लावून तिला आपल्या वडिलांना कडे सुपूर्द केले.
मागील अनेक वर्षांपासून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वेश्याव्यवसायासाठी तिला बेळगावात आणून सोडले. आपल्या आई वडिलांची ताटातूट झालेली ती तरुणी अचानक वडिलांना डोळ्यासमोर पाहून तिचा हुंदका फुटला. त्या तरुणीने एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांना मनापासून धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी लेक आणि बाप यांच्यातील ऋणानुबंध पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले. जावेद मुशापुरी यांनी केलेले हे कार्य वाखाणण्याजोगे असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
7 फेब्रुवारी रोजी बेळगावतील ए पी एम सी पोलिसांनी सदाशिवनगर भागांतील एका घरात हायटेक वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकत दोन एजंटना अटक करून दोन युवतींचे रक्षण केले होते. वेश्या व्यवसायातून वाचवलेल्या दोन युवतीपैकी एक युवतीचे अपहरण झाले होते. त्यामुळे ती या व्यवसायात ढकलली गेली होती. त्या युवतीचा पत्ता शोधून तिला पालकां कडे सुपूर्त करण्याचे काम एपीएमसी पोलिसांनी केले आहे.
ए पी एम सी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी 7 फेब्रुवारीला धाड टाकून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन युवतींची सुटका केली होती. त्यानंतर त्या महिलांची रवानगी महिला रक्षण केंद्रात करण्यात आली होती.इथेच ही केस संपली नाही तर पोलीस निरीक्षक जावेद यांनी आणि महिला रक्षण केंद्राच्या अधिकारी सुरेखा पाटील यांनी सदर युवती कडून विचारणा केली असता त्यातील एक युवती उत्तर प्रदेश गजियाबाद जिल्ह्यातील एका खेडे गावातील असल्याची माहिती मिळाली.2017साली नाबालिक अवस्थेत असताना एका युवका बरोबर प्रेम करून पळून आली होती. ती सुरुवातीला गजियाबाद मध्ये 15 दिवस राहिली होती. त्यांनतर प्रियकराने तिला रेल्वे स्टेशन वर सोडून पलायन केले होते. त्या नंतर सदर युवती रेल्वे मध्ये पडली होती. त्यानंतर एक महिलेने तिला डान्स बार मध्ये कामाला लावली त्यानंतर काही काळ सदर युवती पुणे येथील एका एजंट कडे राहते. त्यानंतर वेश्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या शहरात तिला फिरवले जाते. त्या अनुषंगाने 7 फेब्रुवारीरोजी ती बेळगावला आली होती ए पी एम सी पोलिसांच्या रेड मध्ये तिचे रक्षण करण्यात आले होते.
ए पी एम सी पोलीस स्टेशन समोर तिला तिच्या वडीलाकडे हस्तांतरण करण्यात आले. त्यावेळी तिचे रडू थांबत नव्हते.डी सी पी विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली यु पी पोलीस आणि तिच्या वडिलांकडे तिला सुपूर्त करण्यात आले.