राज्यभर अनेकांनी बोगस कागदपत्रे सादर करून बीपीएल कार्ड मिळविली आहेत. याविरोधात राज्यभरात कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असून यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. बीपीएल कार्ड नियमात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बेकायदेशीर रित्या मिळविलेले बीपीएल कार्ड रद्द करण्यासंदर्भात नुकतीच पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्यात आली होती.
त्यानंतर सोमवारी टीव्ही, फ्रिज, बाईक असणाऱ्या कुटुंबाचे बीपीएल कार्ड रद्द करण्याविषयी त्यांनी वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी आणि जनतेने याला तीव्र विरोध दर्शविला.
यानंतर पुन्हा उमेश कत्ती यांना विचारणा करण्यात आली असता, कोणत्याही कारणास्तव नियमात बदल केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.