Thursday, December 19, 2024

/

मूलभूत नागरी सुविधांसंदर्भात उद्योजकांच्या बैठकीत निर्णय

 belgaum

उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमध्ये पथदीप, पिण्याच्या पाण्याची सोय, चांगले रस्ते, सार्वजनिक मुताऱ्या आदी मूलभूत नागरी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबरोबरच रिंग रोड प्रकल्प अंमलात आणण्याची मागणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. आगामी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील खास प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांना भाजपची उमेदवारी दिली जावी यासाठी सरकारवर दबाव आणण्याचे देखील बैठकीत ठरले.

कारण बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये पाटील यांचा जनसंपर्क चांगला असून त्यांना मठाधीश यांचाही पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसह कळसा-भांडुरा प्रकल्प, ऊस उत्पादकांच्या समस्या आदींसह स्थानिक समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी आघाडीवर असतात. उद्यमबाग येथील उद्योजकांच्या सोयीसाठी रिंग रोड व्हावा, यासाठी देखील त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.Udhyambag

आरएसएसमधून 1970 साली आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे शंकरगौडा पाटील हे अद्याप सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. आरएसएस आणि भाजपमध्ये यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

मुख्यमंत्र्यांची राजकीय सचिव असणारे शंकरगौडा पाटील कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील खास प्रतिनिधी आहेत. हे सर्व पाहता बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ते योग्य उमेदवार आहेत. तेंव्हा भाजपने त्यांनाच पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी उद्योजकांच्या बैठकीत करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.