कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा पंचायत व तालुका पंचायत सार्वत्रिक निवडणुका -2021 साठी मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली आहे.
सदर मार्गदर्शक सूचीमध्ये मतदारसंघांचा तपशील, स्त्री आणि पुरुष मतदारांची संख्या, एकुण मतदार संख्या, अनुसूचित जाती -जमातीची मतदार संख्या आदी माहिती संकलित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
आगामी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय अनुक्रमे जि. पं. आणि ता. पं. जागांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
बेळगाव : जि. पं. जागा 12 -ता. पं. जागा 34, हुक्केरी : 10 -28, खानापूर : 7 -20, चिकोडी : 8 -21, अथणी : 10 -26, रायबाग : 8 -22, निपाणी : 6 -16, कागवाड : 3 -11,
बैलहोंगल : 7 -17, गोकाक : 8 -20, सौंदत्ती : 8 -23, रामदुर्ग : 7 -18, मुडलगी : 4 -11 आणि कित्तूर : जि. पं. जागा 3 -ता. पं. जागा 11. या पद्धतीने बेळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये एकूण जिल्हा पंचायतीच्या 101 तर तालुका पंचायतीच्या 278 जागा आहेत.