बेळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करण्यात येत आहेत. या योजनेतील कामगारांवर लक्ष ठेवणाऱ्या मुकादमांनी आपला पाच रुपयांच्या हिशेबाने प्रलंबित असलेला फरक निधी तात्काळ अदा केला जावा, या मागणीसाठी तालुका पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले
रोजगार हमी योजनेंतर्गत बेळगाव तालुक्यातील बेरोजगारांना काम देण्यात येत आहे. प्रत्येक 40 ते 50 कामगारांमागे एक मुकादमांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना यापूर्वी तीन रुपये फरक निधी देण्यात येत होता. आता त्या निधीमध्ये वाढ झाली असून तो 5 रुपये करण्यात आला आहे. मात्र ती रक्कम आपल्याला मिळत नाही, असे म्हणत संबंधित मुकादमांनी तालुका पंचायतीसमोर धरणे आंदोलन छेडले.
यावेळी घोषणाबाजी करून आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. दरम्यान तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी त्यांची समस्या जाणून घेतली. तथापी मुकादमांनी दिवसभर आपले ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले होते.
रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मुकादमांना पूर्वी तीन रुपये फरक रक्कम देण्यात येत होती. मात्र कांही वर्षांपासून त्यामध्ये बदल करुन ती पाच रुपये करण्यात आली. मात्र आजतागायत ती ती रक्कम देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे, तेंव्हा जोपर्यंत आपल्याला ती रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी म्हंटले आहे.
बेळगाव तालुक्यातील विविध ठिकाणाहून मुकादमानी तालुका पंचायतसमोर आदोलन छेडले होते. यावेळी तालुका पचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी त्याची समजूत काढून सरकारला याबाबत आपण पत्राव्दारे माहिती देवू, असे आश्वासन दिले. मात्र या मुकादमानी आपले आंदोलन सुरुच ठेवले होते. केंद्र आणि राज्य सरकार रोजगार हमी योजनेतर्गत कामगारांना काम देते याचबरोबर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुकादमाची नियुक्ती करण्यात आली आले. दरम्यान तालुका पंचायत समोरील धरणे आंदोलनानंतर तरी सरकार फरक रक्कम देणार का? याकडे मुकादमाचे लक्ष लागून राहिले आहेत.