Friday, November 15, 2024

/

शिवाजीनगरवासियांनी दिला विकास कामे बंद पाडण्याचा इशारा

 belgaum

स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शिवाजीनगर अर्धवट अवस्थेतील विकास कामांमुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे यापुढे नागरिकांना विश्वासात न घेता विकास कामे हाती घेतल्यास आरटीओ सर्कलपासून ते किल्ला तलावापर्यंतची सर्व विकासकामे बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला आहे.

बेळगावमधील स्मार्ट सिटीचे कामकाज म्हणजे अर्धवट कामकाज हे समीकरणच झाले आहे . सुरू केलेले कोणतेही विकास काम पूर्ण केले जात नाही. शिवाजीनगर आणि वीरभद्रनगरातील लोकांच्या घरात, सिव्हिल हॉस्पिटल, ईदगाह मैदान, मिशन कंपाउंड, हेडक्वार्टर्स  या भागात स्मार्ट सिटीच्या विकास कामांचे पाणी शिरत असल्याने हे लोक त्रस्त झाले आहेत.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामाच्या तक्रारींचा पाऊस दिवसेंदिवस वाढत चालला असून जिथे जिथे स्मार्ट सिटी कामकाज तिथे तक्रारी आणि अर्धवट कामकाज हे जणू समीकरणच झाले आहे. शहरात ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी कामकाज सुरु करण्यात आले आहे, त्या प्रत्येक ठिकाणी हे काम निकृष्ठ आणि अर्धवट स्थितीत असल्याचे निदर्शनास येत आहे. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि जनतेच्या मागणीकडे हेतुपुरस्सर कानाडोळा, यामुळे ठिकठिकाणी जनता संतापली आहे.Smart city shivaji nagar

सध्या शिवाजीनगरमध्ये सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामाचे वाभाडे निघाले असून, याठिकाणी अर्धवट स्थितीत शिल्लक राहिलेल्या कामामुळे येथील जनता संताप व्यक्त करत असून आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

शहराच्या मध्यवर्ती मध्यवर्ती भागातील आरटीओ सर्कलजवळ गटारीचे कामकाज हाती घेण्यात आले होते. हे काम अर्धवट स्थितीत आहे. सिव्हिल हॉस्पिटल, ईदगाह मैदान, मिशन कंपाउंड, हेडक्वार्टर्स येथील पाणी थेट शिवाजीनगरमध्ये जनतेच्या घरात शिरत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्ते दुरुस्तीचे कामकाजही हाती घेण्यात आले आहे.

परंतु हे कामसुद्धा अर्धवट स्थितीत आहे. सर्वप्रथम गटारीचे कामकाज पूर्ण करावे, आणि त्यानंतर रस्त्याचे कामकाज हाती घ्यावे, अशी मागणी येथील जनता करीत आहे. सदर कामकाज त्वरित पूर्ण करण्यासाठी आमदार अनिल बेनके आणि संबंधित स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवाजी नगर येथील नागरिकांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.