बेळगाव शहराच्या विकासासाठी स्मार्ट सिटी योजना, रिंग रोड आणि यासह अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी निरंतर प्रयत्न करणारे सरकाचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
बेळगावमधील अनेक वकील, विणकर संघटना, कामगार संघटना, महिला सामाजिक कार्यकर्त्या, विविध उद्योजक, विविध संघटनांचे नेते आणि नागरिकांनी शंकरगौडा पाटील यांनी बेळगावच्या विकासासाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करत त्यांना आगामी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची मागणी केली.
बेळगावमध्ये रिंग रोड आणि स्मार्ट सिटी योजना कार्यान्वित करण्यामागे तसेच अनेक योजना कार्यान्वित करण्यामागे शंकरगौडा पाटील यांचे प्रयत्न असून रिंग रोड संदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची अनेकवेळा भेट घेतली आहे. यासाठी बी. एस. येडियुरप्पा यांचेही सहकार्य मिळाले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजप वरिष्ठांनी त्यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली. उमेश शर्मा, कन्नुभाई ठक्कर, गुंडू मस्तमर्डी, ज्येष्ठ नागरिक बेंडिंगेरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.