शनिमंदिर येथे जायंट्सचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक हलगेकर यांच्या मोबाईची चोरी झाली.
दरम्यान याच मंदिरात असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या चोराची छबी कैद झाली आहे. शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी झालेल्या या घटनेवर अद्याप पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही.
चोराची छबी अगदी स्पष्टपणे नजरेसमोर असूनही पोलिसांनी कारवाईसाठी दिरंगाई का केली? असा प्रश्न उद्भवला आहे. शहर परिसरात अनेक अशा घटना घडत असतात. मात्र अनेकवेळा चोर हातावर तुरी देऊन पलायन करतात.
या प्रकरणात चोर स्पष्टपणे नजरेसमोर असून पोलीस अशा आरोपीला मोकळे कसे काय सोडू शकतात? आणि अद्याप या चोराचा शोध घेऊन अटक कशी करण्यात आली नाही? असे प्रश्न उपस्थित होते आहेत.