Monday, November 18, 2024

/

सदाशिवनगर मध्ये हायटेक वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

 belgaum

टिळकवाडीतील न्यू गेट वे युनिसेक्स स्पा नावावर सुरु असलेल्या मसाज सेंटरमध्ये धाड टाकून पोलिसांनी दोघांना अटक व तीन तरुणींची सुटका केली होती शनिवारी सायंकाळीची ही घटना ताजी असताना ए पी एम सी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी एका हायटेक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

सदाशिवनगर शेवटच्या बस स्टॉप जवळ ए पी एम सी पोलिसांनी धाड टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोघांना अटक तर दोन तरुणींची सुटका केली. मारुती बाळाप्पा केळगेरी वय 30 रा.वन्नुर बैलहोंगल व सिद्धप्पा पुंडलिक चौगुला वय 33 रा.हल्लोळी हुक्केरी अशी हायटेक वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांची नावे आहेत.

ए पी एम सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
दोघे आरोपी तरुण मुंबई महाराष्ट्र आणि इतर राज्यातून वेश्या व्यवसाय चालवण्यासाठी तरुणींना बेळगावात आणत होते.पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दर दोन दिवसांनी शहरातील ठिकाण बदलत होते एका गिराहिका कडून अडीच हजार रुपये घेत होते त्यातील तरुणींना एक हजार तर उर्वरित रक्कम आरोपी तरुण घेत होते गेले कित्येक महिने ते असा वेश्या व्यवसाय चालवत होते अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.Sex racket apmc

शनिवारी सी ई एन पोलिसांनी धाड टाकून दोघांना अटक केली होती त्यानंतर लागलीच ए पी एम सी पोलिसांनी शहरात चालणारा हा हायटेक वेश्या व्यवसाय उघडकीस आणला आहे.

बेळगाव शहरात मसाज पार्लर मध्ये अवैध धंदे चालली असल्याच्या तक्रारी वाढलयाची माहिती येत होती अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय देखील चालली असल्याची माहिती मिळताच ए पी एम सी पोलिसांनी धडक कारवाई करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक  केली असून एक सदर व्यवसाय चालवण्यासाठी वापरत असलेली कार देखील जप्त केली  आहे.डी सी पी विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी कारवाई केली असून ए पी एम सी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.